कोरोना विषाणूसाठी कोण कारणीभूत आहे याविषयी विविध कयास लावले गेले आहेत. आता मेसेज फिरतोय की, अमेरिकेतील बॉस्टन विद्यापीठात कार्यरत एका प्राध्यापकाला चीनसाठी काम करतो म्हणून अटक करण्यात आली असून, त्यामुळे कोरोना विषाणू हा चीनने केलेला नियोजित कट आहे हे स्पष्ट होते.

फॅक्ट क्रेसेंडोने या मेसेजची पडताळणी केली असता ही माहिती चुकीची असल्याचे समोर आले.

काय आहे पोस्टमध्ये?

mayds.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

अमेरिकेत कोणत्या प्राध्यापकाला अटक झाली याची सर्वप्रथम माहिती घेतली. रॉयटर्स वृत्तसंस्थेने 28 जानेवारी 2020 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, हॉर्वर्ड विद्यापीठातील रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. चार्ल्स लाईबर यांच्यासह बॉस्टन विद्यापीठ आणि बॉस्टन वैद्यकीय संस्थेत कार्यरत दोन चीनी संशोधकांना अटक करण्यात आली होती. चीनसोबतचे संबंध लपविणे आणि अमेरिकतील संशोधन चोरणे अशा आरोपांखाली त्यांना अटक करण्यात आले होते.

Reuterss.png

मूळ बातमी येथे वाचा – रॉयटर्सअर्काइव्ह

या बातमीमध्ये कोठेही या तिघांचा कोरोनाशी काही संबंध असल्याचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे, अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टीसने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्येसुद्धा या तिघांवर कोरोना विषाणू तयार करणे किंवा चीनला विकणे किंवा त्यांचा कोरोना निर्माण करण्यात काही सहभाग होता असे म्हटलेले नाही.

प्रा. लाईबर यांनी चीनतर्फे मिळालेल्या आर्थिक मदतीचा तपशील वा माहिती अमेरिकेच्या सरकारला दिली नव्हती. जगभरातील संशोधकांना चीनकडे आकर्षित करण्यासाठी चीनने ‘थाउसंड्स टॅलेंट प्लॅन’ हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याअंतर्गत प्रा. लाईबर चीनमधील विद्यापीठाशी निगडित होते. त्याबदल्यात त्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. याची माहिती त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठाला दिली नव्हती. तसेच चौकशीदरम्यानसुद्धा त्यांनी खोटी माहिती पुरवली, याच आधारावर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

इतर ज्या दोन चीन संशोधकांना अटक झाली त्यांपैकी यांकिंग ये ही बॉस्टन विद्यापीठात रोबोटिक्स संशोधक होती. ती चीनच्या सैन्यातील अधिकारी आहे हे लपविल्यामुळे तिला हेरगीरीसाठी अटक करण्यात आली. दुसरा संथोधक झाऊसाँग झेंग हा कॅन्सर संशोधक असून, प्रयोगशाळेतून कर्करोगाचे नमुने चोरल्यामुळे त्याला अटक झाली.

या तिघांचा कोरोना विषाणूच्या निर्मिती अथवा विक्रीमध्ये काही संबंध समोर आला नाही. विषेश म्हणजे एफबीआयने काढलेल्या पत्रकानुसार, या तिघांवर आर्थिक हेरगिरी आणि संशोधन चोरी या गुन्ह्यांसाठी खटला चालविला जाणार आहे.

Fbi.png

मूळ पत्रक येथे वाचा – एफबीआयअर्काइव्ह

मग कोरोना गरफ वाफेने मरतो का?

पोस्टमध्ये असादेखील दावा केला आहे की, गरम पाण्याची वाफ घेतल्यावर 100 टक्के कोरोना विषाणू मरून जातो. परंतु, अमेरिकेची सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि जागतिक आरोग्य संघटनने वाफेमुळे कोरोना बरा होतो असे म्हटलेले नाही. त्यामुळे गरम पाण्याची वाफ सर्दी-खोकला असल्यास घेणे योग्य असले तरी त्यामुळे कोरोना बरा होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

reuetss.png

मूळ लेख येथे वाचा – रॉयटर्सअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेत अटक झालेले प्राध्यापक आणि संशोधकांचा कोरोना विषाणूशी काही संबंध नाही. त्यांना वेगळ्या कारणासाठी अटक करण्यात आली होती.

जगभरातील आघाडीच्या वैज्ञानिकांनी कोरोना विषाणू मानवनिर्मित नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सदरील पोस्टमध्ये करण्यात आलेले दावे असत्य आहेत.

Avatar

Title:बॉस्टन विद्यापीठातील अटक झालेल्या प्राध्यापकाचा कोरोनाशी काही संबंध नव्हता. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False