लोणावळा येथील भुशी डॅमचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असतानाही भुशी डॅमवर एवढे पर्यटक जमलेच कसे, असा प्रश्न त्यामुळे काही जण उपस्थित करत आहेत. काहींनी हा औरंगाबाद येथील हर्सूल तलाव असल्याचा दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने हा लोणावळ्यातील भुशी डॅम किंवा औरंगाबादमधील हर्सूल तलाव आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुक पोस्ट / संग्रहित

तथ्य पडताळणी

लोणावळा येथील भुशी डॅमचा किंवा औरंगाबाद येथील हर्सूल तलावाचा हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घेण्यासाठी औरंगाबाद येथील हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी हा हर्सूल तलाव नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर युटूयूबवर हा व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी व्हायरल व्हिडिओतील ठिकाणाशी साम्य असलेला एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली दिलेल्या माहितीत म्हटले आहे की,भिलवाडापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेला हा गोवटी तलाव आहे.

https://www.youtube.com/watch?v=UwojB_1IaOU

संग्रहित

त्यानंतर हा व्हायरल व्हिडिओ गोवटा डॅमचा असल्याचा दावा अनेकांनी केला असल्याचे दिसून आले. राजस्थानमधील न्यूज 91 उदयपूरने येथे जमलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचे वृत्त दिले असल्याचेही दिसून आले.

https://www.youtube.com/watch?v=M3kK4Xc7qQk

संग्रहित

दैनिक भास्करनेही या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे वृत्त दिले असल्याचे दिसून आले.

screenshot-www.bhaskar.com-2020.08.27-09_04_00.png

दैनिक भास्कर / संग्रहित

निष्कर्ष

लोणावळ्यातील भुशी डॅम किंवा औरंगाबादमधील हर्सूल तलावाचा हा व्हिडिओ असल्याचे असत्य आहे. राजस्थानमधील गोवटा डॅमचा हा व्हिडिओ आहे.

Avatar

Title:भुशी डॅमचा म्हणून राजस्थानातील व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False