गोव्यातील ब्रॅगँझा घाटाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

False सामाजिक

पावसाळा सुरु झाल्यावर घाटमाथ्यांना एक वेगळेच रुप प्राप्त होते. परंतु, घाटांचे व्हिडिओ आणि फोटो अनेकदा वेगवेगळ्या नावे शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे बोगद्या बाहेर घाटावर अनेक धबधबे वाहताना दिसतात. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावे व्हायरल होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही. 

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये, एका बोगद्यातून ट्रेन बाहेर पडत असताना घाटमाथ्यावरुन धबधब्यांची रांग लागलेली दिसते. हा व्हिडिओ कोणी कसारा घाट म्हणून शेअर करत आहेत तर, कोणी खंडाळा घाट म्हणून पसरवित आहे. 

तथ्य पडताळणी

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे शोधण्यासाठी कीवर्ड्स सर्चद्वारे विविध रेल्वे बोगद्याचे व्हिडिओ तपासले.

त्यातून रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर खात्यावरुन हाच व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले. याशिवाय रेल्वे मंत्रालयाच्या युट्युब अकाउंटवरदेखील हा व्हिडिओ उपलब्ध आहे.

ट्विटमध्ये हा व्हिडिओ ब्रॅगँझा घाटातील असल्याचे सांगितले आहे.

कुठे आहे ब्रॅगँझा घाट?

गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवरील डोंगररांगेमध्ये ब्रॅगँझा घाट स्थित आहे. एकुण 26 किमी अंतराचा हा घाट गोव्याल्या कर्नाटकशी जोडतो. हुबळी-गोवा रेल्वेमार्गावर सदरील व्हिडिओतील बोगदा आहे. 

ब्रॅगँझा घाट, हुबळी-गोवा रेल्वेमार्ग (सौजन्य: Poorna & Brinda/Travel Twosome)

फॅक्ट क्रेसेंडो ओडिसाने हा व्हिडिओ यापूर्वी फॅक्ट चेक केला आहे.

निष्कर्ष

यावरुन स्पष्ट होते की, गोव्यातील ब्रॅगँझा घाटाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावाने शेअर केला जात आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गोव्यातील ब्रॅगँझा घाटाचा व्हिडिओ महाराष्ट्रातील विविध घाटांच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False