भास्कर जाधव स्वत:ला कुत्रा म्हणाले नाही; खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणतात की, “भास्कर जाधव म्हणजे काय ? त्याला कोणी तरी सांगितल की, दोन बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव.” दावा केला जात आहे की, भास्कर जाधव यांनी स्वत:लाच कुत्रा म्हटले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ […]

Continue Reading

नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या विजयी रॅलीमध्ये पाकिस्तानी झेंडा नव्हता; तो इस्लामिक झेंडा आहे

नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात घवघवीत यश मिळाले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर विजय रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात एक चांद-सितारा असणारा हिरवा झेंडा दिसतो.  दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

ऊबाठा गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकविण्यात आला का ? वाचा सत्य

शिवसेना उबाठा गटाचे अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे आहेत. याच पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांच्या चेंबूरमधील प्रचार रॅलीमध्ये पाकिस्तानाचा झेंडा फडकविण्यात आला, या दाव्यासह त्यांचा रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानाचा नाही तर इस्लामिक झेंडा […]

Continue Reading

उद्धव ठाकरेंनी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हटले का ?

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे सत्र सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते “सत्तधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा,” असे सांगत आहेत. विरोधी पक्षात असूनदेखील उद्धव ठाकरे सत्तधारी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा […]

Continue Reading

शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद झाल्यानंतर आयोग आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत की, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या समर्थनात निर्णय देत जाहीर केले की शिवसेना केवळ उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

Fake News: शिवसैनकाने काढला पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू? फेक फोटो व्हायरल

एका शिवसैनिकाने पार्श्वभागावर संजय राऊत यांचा टॅटू गोंदविला, असा फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरे या शिवसैनिकाचे टॅटू पाहताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो खोडसाळपणे एडिट केलेला आहे.  काय आहे दावा? मूळ पोस्ट […]

Continue Reading

वेळ पडली तर शिवसेना राष्ट्रवादीच्या निशाणीवर निवडणूक लढवणार, असे संजय राऊत म्हणाले नाही

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट तयार केल्याने शिवसेना नेमकी कोणाची यावरून संग्राम सुरू आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक निशाणी वापरण्यावरून उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गट या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “वेळ पडली तर शिवसेना पुढील निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर लढवणार”, असे संजय राऊत म्हणाले. ‘लोकसत्ता’ वृत्तपत्राचा […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘सैनिक’ औरंगजेबला शहीद म्हटले होते; मुघल सम्राट औरंगाबजला नाही

उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते “औरंगजेब देशासाठी शहीद” झाला असे म्हणतात. या क्लिपसोबत दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेबची स्तुती करताना त्याला शहीद म्हटले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी कळाले की, हा […]

Continue Reading

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भासह व्हायरल; वाचा सत्य

राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादळादरम्यान एका उद्धघाटन समारंभा प्रसंगी दोन गटात झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, नवी मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये “तुंबळ मारामारी” झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ सुमारे तीन […]

Continue Reading

अब्दुल सत्तार यांचा ‘अर्वाच्य शिवीगाळ’ करतानाचा 5 वर्षे जुना व्हिडियो व्हायरल; वाचा सत्य

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार एका जणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असतानाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये सत्तार कथितरीत्या एका व्यक्तीला धमकावत असताना हनुमानाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत असल्याचे ऐकू येते. सध्या सुरू असलेल्या ‘अझान विरुद्ध हनुमान चालिसा’ वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करून […]

Continue Reading

नमाजसाठी बंद करण्यात आलेला रस्ता उघडण्यासाठी भाजप आमदाराने हुज्जत घातली नव्हती; वाचा सत्य

मुंबईत शिवसेनेतर्फे नमाजसाठी रस्ता बंद करण्यात आल्यामुळे भाजप आमदार योगेश सागर यांनी पोलिसांशी हुज्जत घालत रस्तावरील बॅरिकेड्स काढले, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले, की सागर यांची पोलिसांशी हुज्जत नमाजच्या कारणासाठी नाही तर वेगळ्या कारणासाठी बाचाबाची […]

Continue Reading

शिवसेनेच्या पोस्टरवर आता बाळासाहेबांच्या गळ्यात भगव्याऐवजी ‘हिरवा शेला’? वाचा सत्य

शिवसेनेच्या मुंबईतील एका नेत्याचे टिपू सुलतानाला अभिवादन करणारे पोस्टर सोशल मीडियावर सध्या बरेच गाजत आहे. या पोस्टरवर शिवसेनेच्या पारंपरिक भगव्या रंगा ऐवजी हिरवा वापरलेला दिसतो. अगदी पक्षाचे नाव, लोगो आणि बाळासाहेब ठाकरेंचा प्रसिद्ध भगवा शेलासुद्धा हिरव्या रंगात दाखवलेला आहे.  या पोस्टरवरून शिवसेने विचारधारा बदलली का? असा सवाल केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो […]

Continue Reading

FACT CHECK: ‘शिवथाळी’साठी आधारकार्ड सक्तीचे आहे का? वाचा सत्य

राज्यातील गरीब व गरजू लोकांना केवळ 10 रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या ‘शिवभोजन’ योजनेला येत्या प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे गोरगरिबांना दहा रुपायांमध्ये पोटभर जेवण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. ‘शिवभोजना’ची चव चाखण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा […]

Continue Reading

FAKE NEWS: आदित्य ठाकरे आणि रेवती सुळे यांच्या साखरपुड्याची केवळ अफवाच!

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ठाकरे आणि पवार कुटुंबांविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. दोन्ही कुटुंबातील सदस्य कसे एकमेकांचे नातेवाईक आहेत किंवा होणार आहेत यासंबंधी मेसेज आणि पोस्ट फिरू लागल्या. अशाच एका मेसेजमध्ये म्हटले जात आहे की, खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि आमदार […]

Continue Reading

शिवसेनेच्या विरोधात जमीयत उलेमा-ए-हिंदच्या नावे फिरणारे ते व्हायरल पत्र बनावट. वाचा सत्य

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास एक महिना होत आला तरी महाराष्ट्रात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा महाआघाडीचे नवे समीकरण तयार होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मुस्लीम संघटनेने सोनिया गांधी यांना पाठवलेले पत्र सध्या गाजत आहे. व्हायरल होत असलेल्या या […]

Continue Reading

अहमदनगरच्या शिवसेना शहरप्रमुखाने उद्धव ठाकरेंवर टीका करणारे पत्र लिहिले का? जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजचे सत्य

विधानसभेच्या निकालानंतर चारही प्रमुख पक्षांना राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश आले नाही. भाजप-शिवसेना युतीचे बिनसल्यानंतर सत्तास्थापनेअभावी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, बहुमताची आकडेमोड जुळवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे पाठिंबा मागितला. त्यानंतर ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का अशी अटकळ बांधण्यात येऊ लागली. सेनेच्या या भूमिकेचा विरोध करणारे एक पत्र सोशल मीडियावर सध्या प्रचंड गाजत आहे. दावा केले जात […]

Continue Reading

विधानसभेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांनी अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये युतीला सत्ता कायम राखण्यात यश आले. भाजप आणि शिवसेना राज्यात अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमाकांचे पक्ष ठरले. त्यामुळे शिवसेनेकडून यंदा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह केला जाऊ लागला. ठाकरे कुटुंबातून प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे.  याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचे अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला भेट […]

Continue Reading

जातीवादावर चित्रपट न काढण्याचा शिवसेनेने इशारा दिला आहे का? जाणून घ्या खरं काय आहे

आयुषमान खुराणा प्रमुख भूमिकेत असेलल्या ‘आर्टिकल 15’ या सिनेमाच्या ट्रेलरची सध्या खूप चर्चा आहे. जातीवादावर प्रखरपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. संवेदनशील विषय हाताळत असल्यामुळे चित्रपटाविषयी काही वादग्रस्त पोस्टदेखील केल्या जात आहेत. शिवसेनेने या चित्रपटाला विरोध दर्शवित जातीवाद हा विषय घेऊन चित्रपट न काढण्याचा इशारा दिल्याचा दावा सोशल मीडियावर केला […]

Continue Reading