सोशल मीडियावर सद्ध्या एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी एका वृद्धाला बेदम मारहाण करताना दिसतो.

दावा केला जात आहे की, हा घटना उत्तर प्रदेशची असून प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल घटना उत्तर प्रदेशची नसून मध्य प्रदेशमधील आहे आणि ध्रुव राठीने हा व्हिडिओ शेअर केला नव्हता.

काय आहे दावा ?

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये दावा केला गेला आहे की, ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली असून ध्रुव राठीने या प्रसंगाचा व्हिडिओ ट्विटर शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ ध्रुव राठीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला नाही.

ध्रुव राठी (पॅरडी) नामक अकाउंटने हा व्हिडिओ 23 जून रोजी ट्विटरवर शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “उत्तर प्रदेश जंगलराजकडे वाटचाल करत आहे. पोलीस त्या वृद्धाला कसे बेदम मारहाण करत आहेत ते पहा.”

हे ध्रुव राठीचे अधिकृत अकाउंट नसून त्याच्या नावाचे फॅन पेज अकाउंट आहे. या अकाउंटचा ध्रुव राठीशी संबंध नाही.

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

अधिक सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

न्यूज-18 च्या बातमीनुसार 27 जुलै रोजी मध्य प्रदेशामधील जबलपूर रेल्वे स्थानकावरील 5 नंबर प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली होती.

व्हिडिओमध्ये वृद्धाला मारहाण करणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव अनंत मिश्रा होते.

रेल्वे पोलीस स्टेशन प्रभारींनी सांगितले की, कॉन्स्टेबल अनंत मिश्रा यांनी ज्या व्यक्ती सोबत मारहाण केली, तो व्यक्ती दारूच्या नशेत फलाटावरील प्रवाशांशी गैरवर्तन करत होती. कॉन्स्टेबल अनंत मिश्राने त्या व्यक्तीला थांबवल्यावर मद्यधुंद व्यक्तीने त्याच्याशी हुज्जत घातली होती. आज तकने हिच बातमी शेअर केली होती.

व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) प्रतिमा पटेल यांनी माध्यमांना सांगितले की, कॉन्स्टेबल अनंत मिश्रा हे रीवा जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिक माहिती आपण येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, पोलिस कर्मचाऱ्याने रेल्वे स्थानकावर मारहाण करण्याची घटना उत्तर प्रदेशची नाही. ही घटना दोन वर्षांपूर्वी मध्य प्रदेशच्या जबलपूर स्थानकावर घडली होती. तसेच ध्रुव राठीने हा व्हिडिओ शेअर केला नव्हता.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पोलिसाने वृद्धाला मारहाण करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील नाही; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading