FACT CHECK: सोलापूर विमानतळावरील आगीच्या व्हिडियोचे सत्य जाणून घ्या.

False सामाजिक

कोरोना विरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिल 2020 रोजी रविवारी रात्री 9 वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सोलापूर शहरात काही उत्साही नागरिकांनी फटाके फोडले. त्यामुळे सोलापूर विमानतळाजवळ आग लागली, असा दावा केला जात आहे. या आगीचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने केलेल्या तथ्य पडताळणीतून दिसून आले की, सोलापूर विमानतळाजवळ 5 एप्रिलला आगली ही खरी गोष्ट आहे. परंतु, व्हायरल होत असलेला व्हिडियो दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीचा आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

व्हिडियोची तपासणी करताना आढळले की, सोलापूर विमानतळाच्या गवताला 5 एप्रिल रोजी रात्री आग लागली होती. जवळच्या सोसायटीतील फटाकेबाजीमुळे ठिणगी पडून ही लागल्याचे वृत्त लोकमतने दिले. यामध्ये दीड एकर जमिनीवरील गवत खाक झाले. विमान धावपट्टीपासून ही आग दूर होती.

म्हणजे 5 एप्रिलला आग तर लागली होती. पण मग व्हिडियो याच आगीचा आहे का?

युटूयूबवर एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील एक व्हिडियो आढळला. या वृत्तानुसार, सोलापूर विमानतळ परिसरात 3 फेब्रुवारी 2020 रोजीदेखील भीषण आग लागली होती. वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने हा आगीचा भडका उडाला होता.

Archive

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडियोताल दृश्याची आणि जुन्या व्हिडियोची दृश्याची आम्ही खाली तुलना केली आहे. यावरून दिसते की, आगीचे हे दृश्य दोन महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीचे आहे.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सोलापूर विमातळाजवळ 5 एप्रिल रोजी आग लागली होती. परंतु, या आगीचा म्हणून जो व्हिडियो शेयर केला जात आहे, तो दोन महिन्यांपूर्वीचा आहे. 

Avatar

Title:सोलापूर विमानतळावरील आगीचा जुना व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False