
टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावर दिलेला हरणांचा कळप म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. असं द्दश्य प्रत्येकाला दिसत आहे. आठ-दहा हरणं कधीही कुठेही दिसतात. पण एवढी हरणं एकाचवेळी दिसणं म्हणजे निव्वळ भाग्य असलं पाहिजे भाग्य…असं म्हणत हा व्हिडिओ अनेक जण शेअर करत आहेत. हा व्हिडिओ टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील हरणांचा हा व्हिडिओ आहे का? याबाबतचे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांचा खालील व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत त्यांनी ही द्दश्ये सोलापूर परिसरातील नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही द्दश्ये सोलापूर परिसरातील नसतील तर मग कुठली आहेत, असा प्रश्न पडल्याने शोध पुढे नेला. तेव्हा कर्नाटकमधील विजय कर्नाटका या दैनिकाच्या युटूयूब चॅनलवर आणि ट्विटर हॅण्डलवर 29 एप्रिल 2020 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखाली देण्यात आलेल्या माहितीत हे बेल्लारी अडोनी रस्त्यावरील लॉकडाऊनच्या काळातील द्दश्य असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर हा व्हिडिओ 3 मे 2020 पासून युटूयूबवर उपलब्ध असल्याचेही दिसून आले. त्यावेळीही हा कर्नाटकातील असल्याचे म्हटलेले आहे.
या व्हिडिओत खाली प्रतिक्रिया देताना हे ताल छापर अभयारण्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजस्थानमधील चुरू जिल्ह्याचे वनाधिकारी लाल शर्मा यांच्याशी संपर्क साधला. हा व्हिडिओ खूप जुना असून तो तालछापर अभयारण्यातीलच असल्याचे त्यांनी सांगितले. अशाच स्वरुपाचा एक व्हिडिओ आम्हाला युटूयूबवर दिसून आला तो आपण खाली पाहू शकता.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील टेंभूर्णी-सोलापूर रोडवरील असल्याचा दावा असत्य आहे.
निष्कर्ष
महाराष्ट्रातील टेंभूर्णी-सोलापूर रोडवरील हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे.

Title:हरणांचा हा कळप टेंभूर्णी-सोलापूर रस्त्यावरील आहे का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
