Fact Check : काश्मीरमधील जुना फोटो जेएनयूतील जखमी विद्यार्थी म्हणून व्हायरल

False राजकीय | Political राष्ट्रीय

JNU ची काय स्थिती करुन ठेवली आहे, येथे प्रत्येक जाती-धर्माचा गरीब श्रीमंत अशा सगळ्या वर्गातील विद्यार्थी करियर घडविण्यासाठी येतात. प्रश्न असा आहे की JNU तील विद्यार्थी काय चांगले काय वाईट हे समजु लागले आहेत. मनुवाद्यांच्या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांचे हे हाल होत आहेत. मनुवाद्यांच्या ताब्यात असलेली माध्यमे हे सत्य समोर येऊ देणार नाहीत. मी JNU सोबत आहे, अशी माहिती असलेले पोस्ट अनुराधा हाळाळे यांनी एका छायाचित्रासह केली आहे. हे छायाचित्र खरंच जेएनयूमधील जखमी विद्यार्थ्याचे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Anuradha Halale FB Post Kashmir jnu.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

हे छायाचित्र जेएनयूतील विद्यार्थ्याचेच आहे का, हे जाणून घेण्यासाठी रिव्हर्स इमेज केले, त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला त्यात Avax news या संकेतस्थळावरील एक वृत्त आम्हाला दिसले. या वृत्तात हे छायाचित्र आहे. या व्यक्तीने सुरक्षा दलांनी केलेल्या मारहाणीत आपण जखमी झाल्याचे सांगितल्याचे या वृत्तात म्हटलेले आहे. आपण हे छायाचित्र आणि त्या व्यक्तीने दिलेली माहिती खाली पाहू शकता. 

image2.png

Archive 

त्यानंतर आम्हाला 19 ऑगस्ट 2019 रोजी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तातही या छायाचित्राचा वापर करण्यात आलेला आहे.

image3.png

Archive

निष्कर्ष

छायाचित्रात दिसणारी व्यक्ती ही जेएनयूच्या आंदोलनात जखमी झालेला विद्यार्थी नाही. हे छायाचित्र काश्मीरमधील 2016 मधील छायाचित्र आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : काश्मीरमधील जुना फोटो जेएनयूतील जखमी विद्यार्थी म्हणून व्हायरल

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False