इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर तीन नोव्हेंबर रोजी एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला. यामध्ये इम्रान खान यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. या घटनेनंतर सोशल मीडियवार इम्रान खान यांचे जखमी फोटो शेअर करण्यात येऊ लागले. 

दावा करण्यात येत आहे की, इम्रान यांच्यावरील हल्ल्यानंतरचा हा फोटो आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. 

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो जुना आहे. तो खान यांच्यावरील हल्ल्यानंतरच नाही.

काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक 

तथ्य पडताळणी

या फोटोला रिव्हर्स इमेस सर्च केल्यावर कळाले की हा फोटो 2014 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

इम्रान खान यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरूनच 17 ऑगस्ट 2014 रोजी हा फोटो शेअर केला होता. सोबत म्हटले होते की, “धरणा आंदोलनाच्या ठिकाणी एक रात्र”

मूळ पोस्ट – ट्विटरअर्काइव्ह

या फोटोविषयी आणखी माहिती घेतली असता कळाले की, ‘ट्रिब्युन’च्या बातमीनुसार, 14 ऑगस्ट 2014 रोजी खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पार्टीतर्फे इस्लामाबादमध्ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. विविध प्रकरणांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी इम्रान खान यांनी केली होती. 

परंतु, पाकिस्तानच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इम्रान खान यांनी आंदोलन मागे घेतले होते. 

इम्रान खान यांच्यावर गोळीबार

इम्रान खान यांनी निवडणुका मागे घेण्याची मागणी करत लाहोर ते इस्लामाबाद असा मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान गुरुवारी (3 नोव्हेंबर) इम्रान खान यांच्यावर गोळीबार झाला होता. यामध्ये त्यांच्या पायाला गोळी लागली. 

हा हल्ला करणाऱ्या हल्ल्याखोराला पकडण्यात आले असून त्याने हा हल्ला का केला यामागचे कारणही त्याने सांगितले होते. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, इम्रान खान यांचा व्हायरल होत असलेला फोटो त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतरचा नाही. हा फोटो 2014 मधील असून जुना फोटो चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False