हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

False सामाजिक

समाजमाध्यमांमध्ये सध्या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणारे एका मुलीने हातात पोस्टर पकडलेले एक छायाचित्र व्हायरल आहे. मुसलमानांमध्ये आजपर्यंत शिया आणि सुन्नी भाई-भाई होऊ शकले नाहीत तर काही मुर्ख हिंदू लोक हिंदू-मुस्लीम भाई-भाई म्हणत आहेत, असे या पोस्टरवर म्हटलेले आहे. या मुलीने खरोखरच हातात असे पोस्टर घेतले आहे का? ही मुलगी नेमकी कोण आहे? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Muslim Girl.png

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी 

या मुलीने हातात असे पोस्टर घेतले आहे का? ती कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी हे छायाचित्र रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी AL-QUR’AN AND SUNNAH या ब्लॉगवर या मुलीचे मुळ छायाचित्र दिसून आले. ते  ELIMINATE ISLAMIC ARABBISATION STIGMA  या शीर्षकातंर्गत असणाऱ्या लेखात वापरण्यात आले आहे. 

image6.png

Archive

या मुळ छायाचित्रात मुलीच्या हातात असलेल्या पोस्टरवर don’t stereotype me UMW IS A campaign असे लिहिले असल्याचे आपण पाहू शकतो. त्यानंतर हा शब्दप्रयोग करत आम्ही शोध घेतला. त्यावेळी या मोहिमेत या मुलीव्यतिरिक्त अनेक लोक सामील झाले असल्याचे आम्हाला दिसून आले. 

image4.png

काय आहे ही मोहीम

Don’t stereotype me ही मोहीम मैरी वॉशिग्टन विद्यापीठात इस्लामिक स्टुडंट असोसिएशनच्या वतीने चालविण्यात आली. मुस्लीम विद्यार्थ्यांविषयीचा चुकीचा दृष्टीकोन दुर करण्यासाठी ही मोहीम चालविण्यात येत होती. खालील देण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये आपण हे वाचू शकता. 

image2.png

Thatsridicarus (Archive) आणि lotterleben (Archive) या पानांवर तुम्हाला याबाबत अधिक माहिती मिळू शकते. यांडेक्स रिव्हर्स सर्चद्वारे मिळालेली छायाचित्रेही आपण खाली पाहू शकता.

image1.png

मुळ छायाचित्राची आणि समाजमाध्यमात व्हायरल होणाऱ्या छायाचित्राची केलेली तुलना आपण खाली पाहू शकता.

2020-05-09.png

निष्कर्ष

युवतीच्या मुळ छायाचित्रात फेरफार करुन हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्यावर या मुलीने कोणतीही टिप्पणी केल्याचे असत्य आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:हिंदू-मुस्लीम ऐक्यावर टिप्पणी करणाऱ्या या छायाचित्राचे सत्य काय?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False