‘IC 814: द कंदहार हायजॅक’ ही वेब सिरीज 29 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

या पार्श्वभूमीवर एका दावा केला जात आहे की, “द कंदहार हायजॅक वेब सिरीज निर्माते दहशतवाद्यांसाठी हिंदू नावांचा वापर करून मुस्लिम ओळख लपवण्याचा प्रयत्न करीत आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, या वेब सिरीजमध्ये दहशतवाद्यांनी वापरलेली खरी हिंदू नावे दाखवण्यात आली आहेत.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये ‘द कंदहार हायजॅक’चे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "कंदहार विमान अपहरणप्रकरणी वेबसिरीजमधून हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र. विमान अपहरण करणाऱ्यांची खरी नावे: मोहम्मद इब्राहिम अख्तर, मोहम्मद शाहिद अख्तर, मोहम्मद सनी अहमद, मोहम्मद जहूर मिस्त्री, मोहम्मद शाकीर. पण वेब सिरीज IC814 मधील दहशतवाद्यांची नावे: *भोला, *शंकर. इस्लामी दहशतवादाचे वाईट कृत्य वेब सिरीजमध्ये लपवण्याचा प्रयत्न का?"


मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर आम्हाला 6 जानेवारी 2000 रोजी अपहरणाच्या संदर्भात तत्कालीन केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेले विधान आढळले.

अपहरणकर्त्यांची ओळख: इब्राहिम अथर, बहावलपूर; शाहिद अख्तर सईद, गुलशन इक्बाल, कराची; सनी अहमद काझी, डिफेन्स एरिया, कराची; मिस्त्री जहूर इब्राहिम, अख्तर कॉलनी, कराची; आणि शकीर, सुक्कूर शहराचा उल्लेख होता.

हे अपहरण आयएसआयचे ऑपरेशन होते, जे हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेच्या मदतीने करण्यात आले होते, त्यातील पाचही अपहरणकर्ते पाकिस्तानी होते.

"अपहरण केलेल्या ठिकाणावरील प्रवाशांना, हे अपहरणकर्ते चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर म्हणून ओळखले जात होते. "अपहरणकर्ते नेहमी एकमेकांना या नावांनी संबोधीत होते." अशीही माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली.


मूळ पोस्ट – केंद्रीय गृह मंत्रालय | आर्काइव्ह

पुढे लॉस एंजेलिस टाईम्सने 2 जानेवारी 2000 रोजी प्रकाशित केलेल्या अहवालातदेखील “इंडियन एअरलाइन्स फ्लाइट 814 च्या पाच अपहरणकर्त्यांची कोड नावे प्रमुख, भोला, शंकर, डॉक्टर आणि बर्गर, अशी नावे आढळली.


मूळ पोस्ट – लॉस एंजेलिस टाईम्स | आर्काइव्ह

खंडन

‘द कंदहार हायजॅक’ या वेब सिरीजचे लेखक पत्रकार नीलेश मिश्रा यांनी 31 ऑगस्ट रोजी ट्विट करत व्हायरल दाव्याचे खंडन केले.

ते पोस्टमध्ये लिहितात की, “सर्व अपहरणकर्त्यांनी शंकर, भोला, बर्गर, डॉक्टर आणि चीफ अशी स्वत:ची खोटी नावे ठेवली होती. अपहरण करताना ते एकमेकांना या नावांनी हाक मारत. तसेच प्रवासीदेखील त्यांना याच नावांने संबोधत असत.”


मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तसेच वेब सिरीजचे डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी स्पष्ट केले होते की, “अपहरणाच्या वेळी दहशतवाद्यांनी एकमेकांना संबोधण्यासाठी बनावट नावे वापरली होती.” अधिक माहिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ‘द कंदहार हायजॅक’ या वेब सिरीजमध्ये दहशतवाद्यांनी वापरलेली खरी हिंदू नावे दाखवण्यात आली असून मुस्लिम ओळख लपवल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)


Claim Review :   Fact Crescendo
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISLEADING