पंडित नेहरूंनी आदिवासी महिलेच्या हस्ते भाभा अणु प्रकल्पाचे उद्धाटन केले होते का? वाचा सत्य

Missing Context राजकीय | Political

सोशल मीडियावर एक जुना फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि एक महिला दिसते.

या फोटोसोबत दावा केला जात आहे की, पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका आदिवासी महिलेला भाभा अटॉमिक अणु प्रकल्पाचे उद्धाटन करण्यासाठी आमंत्रित केले होते. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो भाभा अटॉमिक अणु-प्रकल्पाच्या उद्धाटनाचा नाही. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

फोटोमध्ये लिहिलेले आहे की, “भाभा अणु प्रकल्पाचे उद्धाटन एका आदिवासी महिलेल्या हस्ते करण्यात आले होते. हा हही इतिहास आहे, तो फक्त कधी ओरडून सांगायची गरज वाटली नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज द्वारे सर्च केल्यावर द हिंदूने 01 फेब्रुवारी 2021 रोजी हा फोटो अपलोड केलेला आढळला.

फोटोखाली महिती दिली होती की, “1959 मध्ये बुधानी पानशेत धरणावर वीज केंद्राचे उद्घाटन करताना.”

सदरील माहिच्या आधारे अधिक शोध घेतल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमधील मुलीचे नाव बुधनी मंझिआईन असून तेव्हा त्या 15 वर्षांच्या होत्या. बुधनी झारखंडमधील दामोदर वैली कॉरपोरेशनमध्ये (डीवीसी) त्या काम करत होत्या.

बीबीसीच्या बातमीनुसार डिसेंबर 1959 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू दामोदर वैली जवळील पानशेत धरणाच्या उद्घाटनासाठी येणार होते. तेव्हा दामोदर वैली कॉरपोरेशनच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानाच्या स्वागतासाठी बुधनीची निवड केली होती.

बुधनीने पंडित नेहरुंना पुष्पहार घातला. नेहरुंनी धरण बांधणाऱ्या कामगाराच्या हस्ते उद्धाटान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा त्यांनी पानशेत धरणाच्या उद्घाटनासाठी बुधानीला बटण दाबण्यास सांगितले. हा फोटो त्या क्षणाचा आहे.

कादंबरीकार सारा जोसेफ यांनी बुधनी मंझिआईन जिवनावर “बुधनी” हे पुस्तक लिहिलेले आहे. 

त्यांच्या लेखानुसार उद्धाटानाचा कार्यक्रम संपल्यानंतर बुधनी गावात परतल्यावर गावकऱ्यांनी तिला सांगितले की, “पंडित नेहरुंना पुष्पहार घातल्याने प्रथेनुसार ते तुझे पती झाले आहेत.” गावाने बुधनीला बेदखल केले आणि काही काळा नंतर तिला आली नोकरी ही गमवावी लागली.

परंतु, काही वर्षांनी राजीव गांधी यांची बुधानीने भेट घेतली व त्यांची नोकरी परत मिळाली. 

खाली आपण बुधानीच्या हस्ते करण्यात आलेल्या उद्धाटनाचा आणखी एक फोटो पाहू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील आदिवासी महिला भाभा अटॉमिक अणु प्रकल्पाचे उद्धाटनाचा करीत नसून झारखंडमधील पानशेत धरणाच्या उद्घाटन करत होती. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंडित नेहरूंनी आदिवासी महिलेच्या हस्ते भाभा अणु प्रकल्पाचे उद्धाटन केले होते का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: MISSING CONTEXT