व्हायरल फोटोमध्ये एकच वृद्ध महिला दिसत आहे का? : सत्य पडताळणी

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तीन फोटो आहेत. त्यापैकी प्रत्येक फोटोमध्ये एकच वृद्ध महिला कशी? असा प्रश्न विचारला आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने सत्य पडताळणीपर्यंत ही पोस्ट आशुतोष देवधर या फेसबुक अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. या पोस्टला 2 हजार 300 शेअर, 253 लाईक्स आणि 33 कमेंटस् मिळाल्या आहेत.

फेसबुक

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

ही पोस्ट फेसबुकवर इतर अकाउंटवरुनही व्हायरल झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टमध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोमध्ये कॉंग्रेस नेते शशी थरुर, दुसरा फोटो कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तिसरा फोटो भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भाजप केरळ प्रदेश सरचिटणीस के. सुरेंद्रन यांचा फोटो आहे. या सर्वांसोबत एक वयोवृद्ध महिला तीनही फोटोमध्ये दिसत आहे. तीनही फोटोमध्ये दाखविण्यात आलेली महिला एकच आहे का याबद्दल फॅक्ट क्रिसेंटो टीमने केलेली सत्य पडताळणी.

फॅक्ट क्रिसेंडो टीमने सर्वात प्रथम या तीनही नेत्यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटो आहेत का हे शोधले.

  • कॉंग्रेस नेते शशी थरुर  

कॉंग्रेस नेते शशी थरुर यांच्या सोबत फोटोमध्ये असणारी वृद्ध महिला हा फोटो शशी थरुर यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर उपलब्ध नाही. परंतू हा फोटो शशी थरुर यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 12 एप्रिल 2019 रोजी अपलोड झालेला आहे.

अर्काईव्ह

  • कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील वृद्ध महिलेचा फोटो उपलब्ध आहे. हा फोटो राहुल गांधी यांनी फेसबुक ऑफिशिअल अकाउंटवरुन 11 एप्रिल 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

त्याचप्रमाणे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर देखील हा फोटो आहे. फेसबुकवर अपलोड झालेला 11 एप्रिल 2019 चा त्या वृद्ध महिलेचा मुळ फोटो राहुल गांधी यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 08 डिसेंबर 2015 रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.

अर्काईव्ह

  • भाजप नेते के. सुरेंद्रन

भाजप नेते के. सुरेंद्रन हे केरळचे भाजप प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांच्या ऑफिशिअल फेसबुक अकाउंटवर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतील वृद्ध महिलेचा फोटो उपलब्ध आहे.

फेसबुक

अर्काईव्ह

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तीन वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींसोबत एकच वृद्ध महिला दिसत आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमने या फोटोंचा शोध घेतला. त्यानंतर या तीनही राजकीय व्यक्तींसोबत दिसणाऱ्या वृद्ध महिलेचे राजकीय व्यक्तीच्या ऑफिशिअल फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरुन मुळ फोटो शोधले. आता या तीनही राजकीय व्यक्तींसोबत असणाऱ्या या वृद्ध महिलेचा फोटो खाली आपण बघू शकता.

अधिक बारकाईने बघितले तर या तीनही महिला वेगवेगळ्या आहेत. परंतू या तीनही महिला वयोवृद्ध आहेत, तीनही महिलांचे केस पांढरे झाले आहेत, आणि सोशल मीडियावर या तीनही महिलांचे फोटो हे थोड्याफार सारख्याच पोजमध्ये व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या वृद्ध महिलांमध्ये साम्य आहे असे पहिल्या नजरेत वाटते.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील महिलांच्या फोटो क्रमांक 1, आणि फोटो क्रमांक 3 मध्ये असणाऱ्या महिला या वेगवेगळ्या आहेत.

फोटो क्रमांक 1, फोटो क्रमांक 3 मध्ये असणारा सारखेपणा

  • पहिल्यांदा बघितल्यावर या दोन्हीही महिलांनी सारख्याच पद्धतीने गंध लावले आहे.
  • दोन्हीही वृद्ध महिलांनी पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे.

फोटो क्रमांक 1, फोटो क्रमांक 3 मध्ये असणारा फरक

  • फोटो क्रमांक 1 आणि फोटो क्रमांक 3 मधील महिलांच्या केसांच्या पांढरेपणामध्ये फरक आहे. एका महिलेचे केस पुर्णपणे पांढरे झाले असून, एका महिलेचे केस कमी-जास्त प्रमाणात पांढरे झालेले आहेत.
  • फोटो क्रमांक 1 आणि फोटो क्रमांक 3 मधील महिलेपैकी एका महिलेच्या नाकामध्ये मोरणी आहे तर दुसऱ्या महिलेच्या नाकामध्ये मोरणी नाही. तसेच त्या दोन्हीही महिलांच्या नाकाची ठेवण वेगवेगळी आहे.
  • फोटो क्रमांक 1 आणि फोटो क्रमांक 3 मधील महिलेपैकी एका महिलेचे हसताना सर्व दात दिसत आहेत, तर दुसऱ्या महिलेचे समोरचे दात पडलेले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये दाखविण्यात येणाऱ्या तीन फोटोमध्ये एकच महिला विविध राजकीय नेत्यांसोबत आहे असा दावा करण्यात आला आहे. फॅक्ट क्रिसेंडी टीमच्या संशोधनानंतर असे आढळून आले आहे की, व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील तीन फोटोमधील वयोवृद्ध महिला या वेगवेगळ्या आहेत.

  • सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील पहिला फोटो हा कॉंग्रेस नेते शशी थरुर यांचा फोटो केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम प्रचारसभा दोऱ्यातील आहे.
  • कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो हा तामिळनाडू येथील आहे.
  • भाजप नेते के. सुरेंद्रन यांचा फोटो हा केरळ राज्यातील पत्तनमथिट्टा येथील आहे.

त्यामुळे या पोस्टसंदर्भात प्रत्येक फोटोमध्ये एकच वृद्ध महिला कशी हा दावा खोटा आहे.

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये तीन फोटो एकत्र दाखविण्यात आले आहेत. या प्रत्येक फोटोमध्ये एकच महिला कशी हा दावा करण्यात आला आहे. संशोधनानंतर तीन वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींसोबत फोटोमध्ये असणारी महिला वेगवेगळी आहे. त्यामुळे पोस्टमध्ये करण्यात आलेला प्रत्येक फोटोमध्ये एकच महिला कशी हा दावा खोटा आहे.

Avatar

Title:व्हायरल फोटोमध्ये एकच वृद्ध महिला दिसत आहे का? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: False