तथ्य पडताळणी : नीला सत्यनारायण म्हणाल्या का, ईव्हीएम मशीन्स गुजरातमधुन का आणल्या?

False राजकीय | Political

ईव्हीएम मशीन्स गुजरातमधुन का आणल्या, असा प्रश्न माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने नीला सत्यनारायण यांनी खरंच असे काय विधान केले आहे का? याची तथ्य पडताळणी केली आहे.

अक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

नीला सत्यनारायण यांनी ईव्हीएम मशीन गुजरातमधुन का आणल्या?  असा प्रश्न उपस्थित केला आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे वृत्तपत्र कात्रण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण हे वृत्तपत्र कात्रण आम्हाला कुठेही दिसून आले नाही.  त्यानंतर आम्ही ईव्हीएमबद्दल नीला सत्यनारायण यांनी नुकतीच पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे का? ईव्हीएमबद्दल त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, याची माहिती घेतली. त्यावेळी आम्हाला खाली दिलेला व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओत त्यांनी ईव्हीएमबद्दल आपली भूमिका सविस्तर मांडली आहे.

भेलकडूनच ईव्हीएम मशीन मागविल्या जात होत्या, असे नीला सत्यनारायण म्हणाल्याचे या वृत्तपत्र कात्रणात दिसते. त्याविषयी काही माहिती मिळते का? हे शोधले. याविषयी माहिती आम्हाला द इकोनॉमिक्स टाईम्समध्ये आढळली. निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मार्गदर्शन मंडळावर असणाऱ्या रजत मुना यांनी ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी ईव्हीएम मशीनचे सोर्स कोडिंग भेलच करत असल्याचे म्हटले आहे.

अक्राईव्ह लिंक

पोस्टकर्त्याने व अन्य एका व्यक्तीने हे वृत्तपत्राचे बहुधा सकाळचे असावे असे म्हटले आहे.

आम्ही दैनिक सकाळच्या संकेतस्थळावर आणि ई-पेपरवरही हे वृत्त शोधण्याचा प्रयत्न केला पण हे वृत्त आढळून आले नाही. नीला सत्यनारायण यांच्या स्वत:च्या संकेतस्थळावरही हे वृत्त आढळून आले नाही.

निष्कर्ष

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी ईव्हीएम मशीन्स गुजरातमधुन का आणल्या, असा प्रश्न उपस्थित केल्याचे कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त असत्य आढळले आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणी : नीला सत्यनारायण म्हणाल्या का, ईव्हीएम मशीन्स गुजरातमधुन का आणल्या?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: False