सध्या लोकसभा निवडणुकच्या रणधुमालीत राहुल गांधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल गांधी एका पत्रावर स्वक्षरी करत ते काँग्रेस पक्षाच राजीनामा देत असल्याचे सांगतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. मुळात राहुल गांधी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करत होते.

काय आहे दावा ?

राहुल गांधी स्वाक्षरी करत पत्र वाचतात की, "मी राहुल गांधी आज काँग्रेसमधून राजीनामा देत आहे. माझ्या कडून आता निवडक हिंदू असल्याची बतावणी करू शकत नाही. मी अन्याय यात्रा आणि पत्रक काढले परंतु, मोदी राजमध्ये माझ्यासारख्या सर्व भ्रष्टाचाऱ्यांना जेलमध्ये पाठवले जाईल म्हणनून मी माझ्या आजोबांच्या घरी इटलीला जात आहे."

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “आणि अशा प्रकारे मोदीजींना घाबरून राहुल गांधीत ने दिला राजीनामा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे

द हिंदूने आपल्या ट्विटर अकाउंटवर हाच व्हिडिओ 3 एप्रिल रोजी शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "काँग्रेस नेते राहुल गांधींनी केरळमधील वायनाडच्या जिल्हाधिकारी रेणू राज यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला."

https://twitter.com/the_hindu/status/1775476479163265290

राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंवर नामांकन अर्ज दाखल करतानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की, “मी राहुल गांधी, लोकसभेच्या जागेसाठी उमेदवार म्हणून नामांकित दाखल करत आहे.”

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओ एडिट करून बनावट वक्तव्य राहुल गांधीच्या नावाने शेअर केले जात आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी राजीनामा देत नसून तो बनावट आहे. राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्ये लोकसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला नाही; बनवट आवाजाने तयार केलेला व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered