संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून “उठसूठ मी हिंदू का बोंबलता” असे म्हटले नव्हते; वाचा सत्य

आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत राहणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्याविषयी एक दावा व्हायरल होत आहे. टीव्ही-9 मराठी वाहिनीचे ग्राफिक्स वापरून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, राऊत यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून थेट उद्धव ठाकरेंनाच सवाल केला.  व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारले की “उठसूठ मी हिंदू, मी हिंदू, बोंबलत का […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: अशोक गहलोत यांनी अमृतपाल सिंहचे समर्थन केले नाही; वाचा सत्य

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा एका व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये ते खलिस्तानची मागणी करणाऱ्या अमृतपाल सिंहला कथितरीत्या समर्थन देत असल्याचे दिसते. व्हायरल क्लिपमध्ये ते पत्रकारांशी बोलताना अमृतपाल सिंहने खलिस्तानबाबत केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

Continue Reading

MODI DEGREE: नरेंद्र मोदींच्या डिग्रीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद संपता संपत नाही. त्यांच्या पदवीच्या अधिकृततेविषयी शंका उपस्थित करणारे आक्षेप आणि आरोप अधुनमधून केले जातात. अशाच एका नव्या दाव्यामध्ये नरेंद्र मोदींच्या पदव्युत्तर पदवीवर निवृत्त कुलगुरुची स्वाक्षरी आहे, असे म्हटले आहे.  1983 साली मोदींच्या एम. ए. पदवीवर सही करणारे कुलगुरू प्रा. के. एस. शास्त्री दोन वर्षे आधीच म्हणजे 1981 सालीच निवृत्त […]

Continue Reading

चंद्रकांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितल्याच्या खोट्या पोस्ट व्हायरल; वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस गृहमंत्री’ म्हणून हेटाळणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला.  शिंदे गटाच्या महिलांनी कार्यकर्त्यांनी ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना कथितरीत्या मारहाण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांसमोर थेट इशारा दिला की, “या पुढे […]

Continue Reading

APRIL FOOL: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची अफवा; वाचा सत्य

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू? शिंदे सरकार जाणार? वाचून आश्चर्य वाटले ना. वाटायलासुद्धा पाहिजे. सोशल मीडियावर अशा वावड्या उठल्या आहेत. टीव्ही-9 मराठी वाहिनीच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ शेअर करून अफवा पसरविली जात आहे की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती […]

Continue Reading

हैदराबादमधील जुना व्हिडिओ संभाजीनगरमध्ये दंगेखोरांच्या अटकेचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

राम नवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे दोन गटांतील भांडणाचे पर्यवसन दगडफेक आणि जाळपोळीत झाले. शहरातील किराडपुरा भागात उफाळलेल्या हिंसाचारात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून 17 वाहनांची जाळपोळ झाली. शहर पोलिसांनी सुमारे 500 जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे दाखल केले असून दोषींचे अटकसत्र सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर पोलिस काही लोकांना रस्त्यावरून फरफटत ओढून […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी 2013 साली खरंच खासदारकी वाचविणारा अध्यादेश फाडला होता का? वाचा सत्य

‘सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे?’ या वक्तव्यामुळे गेल्या आठवड्यात मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी गमवावी लागली. लोकसभा सचिवालयाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, लोकप्रतिनिधी कायद्याचे (1951) कलम 8 आणि संविधानातील कलम 102(1) अंतर्गत राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.  या पार्श्वभूमीवर बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा कागद फाडणारा एक […]

Continue Reading

उद्धव ठाकरे यांनी ‘मला लढाऊ माणसं नको, विकाऊ माणसं हवी’ असे म्हटले का? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका सभेत बोलताना “मला लढाऊ माणसं, नको विकाऊ माणसं हवीत” असे म्हटले या दाव्यासह एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट करून विधानामध्ये फेरफार केलेली आहे.  काय आहे दावा ? […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेलसाठी दावेदार असे अस्ले तोजे म्हणाले नव्हते, खोटी बातमी व्हायरल

नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे नुकतेच भारतात दौऱ्यावर असताना त्यांनी रशिया-युक्रेन युद्धावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले होते.  या पार्श्वभूमीवर अस्ले तोजे यांनी पंधप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्कारसाठी मोठे दावेदार आहेत, असे म्हटल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी अशा पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. […]

Continue Reading

अजित पवारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना ‘फुकटे’ म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल 

जुनी पेन्शन योजना परत लागू करावी यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय अधिकारी व कर्मचारी 14 मार्च रोजी बेमुदत संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “संपावर जातात आणि कर्मचाऱ्यांना काम न करता फुकटचा पगार घेण्याची सवय लागली आहे.” दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हटले नाही; एडिट केलेला स्क्रीनशॉट व्हायरल

आदित्य ठाकरे विविध ठिकाणी शिवगर्जना सभा घेत आहेत. 13 मार्च रोजी त्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी क्रीडांगणात शिंदे-भाजप युतीवर जोरदार टीका करणारे भाषण केले.  या पार्श्वभूमीवर झी-24 तास वाहिनीच्या बातमीचा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री म्हणजेच त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांना ‘करप्ट माणूस’ म्हटल्याचे दिसते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणुकीतील पराभवानंतर नितीन गडकरींच्या नावावर खोटे विधान व्हायरल; वाच सत्य

बहुचर्चित कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रसाने यांचा पराभव केला. यासह गेल्या 28 वर्षांपासून बालेकिल्ला असलेली ही जागा भाजपला गमवावी लागली. प्रतिष्ठेची बनलेल्या या पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत वाद समोर येत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने एक वादग्रस्त पोस्ट व्हायरल होऊ लागली. या पोस्टमध्ये गडकरी यांनी कथितरीत्या […]

Continue Reading

योगी आदित्यनाथ यांनी पोलिस हवालदाराच्या अंत्यसंस्काराची राख कपाळाला लावली नाही; वाचा सत्य

उत्तर प्रदेशमधील बसपा आमदार राजू पाल खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी रोजी भर दिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. पूर्व खासदार अतीक अहमद यांच्या साथीदारांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये उमेश पाल यांचा सुरक्षारक्षक पोलिस हवालदार संदीप निषाद यांचासुद्धा मृत्यू झाला.  या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमाने दावा केला जात आहे की,  […]

Continue Reading

इंदूरमधील होळीचा व्हिडिओ कसबा पेठेतील विजयी रवींद्र धंगेकर यांची ही मिरवणूक म्हणून व्हायरल

नुकतेच पार पडलेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून  काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. यानंतर हजारोंच्या संख्येने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, आमदार धंगेकर यांनी काढलेल्या जंगी विजयी मिरवणुकीचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) नुकतीच जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, पाण्याचे कारंजे आणि चित्रकारीने नटलेल्या शहरातील देखाव्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.  असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे की, तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

कसबापेठ पोटनिवडणूक: एकनाथ शिंदे यांच्या नावाने निवडणूक आयोगबद्दल खोटे विधान व्हायरल

बहुचर्चित कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीची रस्सीखेच आज अखेर संपली. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर कसबापेठतून विजयी झाले. तत्पूर्वी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक वादग्रस्त विधान व्हायरल होऊ लागले.  सरकारनामा या वेबसाईटचे ग्राफिककार्ड वापरून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने त्यांना कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल असे सांगितले. […]

Continue Reading

अर्धवट व्हिडिओ: उद्धव ठाकरे यांनी कोणत्या औरंगजेबला आपला भाऊ म्हटले? वाचा सत्य

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘औरंगजेब’ला त्यांचा भाऊ म्हणून संबोधतानाची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपच्या माध्यमातून युजर्स त्यांच्यावर मुघल सम्राटाचे कौतुक केले म्हणून टीका करीत आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणअंती कळाले की, अर्धवट क्लिप व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे मुघल सम्राट औरंगजेबविषयी […]

Continue Reading

नरेंद्र मोदी व अमित शाहा निवडून आले तर पाकिस्तान बरबाद, असे केजरीवाल म्हटले नव्हते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा हे परत निवडणूक जिंकले तर ते दोघे मिळून पाकिस्तानला बरबाद करून टाकतील.” फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताणळीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. […]

Continue Reading

मोदींना हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या, असे शरद पवारांनी म्हणाले नाही; वाचा सत्य

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.  या मेळाव्यातील शरद पवारांचे छायाचित्र वापरून सूचित केले जात आहे की, त्यांनी भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे वक्तव्य केले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या […]

Continue Reading

राहुल गांधीसोबतची व्यक्ती नॅथन अँडरसन नाही; जर्मन नेत्यासोबतचा जुना फोटो व्हायरल 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी रोजी लोकसभेतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अडाणी यांचे एकत्रीत फोटो दाखवून त्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यानंतर लोकसभेत एकच गदारोळ माजला.  या पर्श्वभूमीवर राहुल गांधींचा एक व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, राहुल गांधी यांनी अदानी समुदायाविरोधात गौप्यस्फोट करणाऱ्या ‘हिंडनबर्ग रिसर्च’ […]

Continue Reading

शिवसेना ही उद्धव ठाकरेंची असल्याचा कोर्टाने निर्णय दिलेला नाही; जुनी बातमी व्हायरल

खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद झाल्यानंतर आयोग आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत की, उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या समर्थनात निर्णय देत जाहीर केले की शिवसेना केवळ उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे […]

Continue Reading

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला फसवे म्हटले का? जुना व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतियक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ते “अर्थसंकल्प” अतिशय फसवा असल्याचे म्हणतात. यावरून दावा केला जात आहे की, फडणवीसांनी मोदी सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.   फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती निर्मला सीतारमण यांचे वडिल नाहीत; वाचा सत्य

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, निर्मला सीतारमण यांचा एका ज्येष्ठ व्यक्तीशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, ती व्यक्ती सीतारमण यांचे वडिल आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी इंग्लंडमध्ये पोंगल साजरा केला का? कॅनाडातील व्हिडिओ व्हायरल

दक्षिणेकडील राज्यांमध्ये नुकतेच पोंगल सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील व्हिडिओद्वारे माध्यमातून पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे दावा केल जात आहे की, ऋषी सुनक यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसोबत केळीच्या पानावर जेवण करीत पोंगल साजरा केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची […]

Continue Reading

Clipped Video: हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी त्यांची पाठराखण केली का?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)  13 जानेवारी रोजी छापेमार केली. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर ही कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकरांची एक प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची धाड पडल्यानंतर नाना पाटेकरांनी मुश्रीफ यांचे समर्थन करताना […]

Continue Reading

ओवैसी कृष्ण भजन गातानाचा तो व्हायरल व्हिडिओ बनावट; वाचा सत्य

‘एआयएमआयएम’ (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा कृष्ण भजन गातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यासपीठावरून ते ‘अरे द्वारपालो’ गाताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.   पडताळणीअंती कळले की, हा व्हिडिओ बनावट आहे. ओवैसी यांच्या भाषणाला एडिट करून त्यात गाणे लावण्यात आले आहे.  काय आहे दावा […]

Continue Reading

फाटक्या कपड्यातील विद्यार्थ्याचा फोटो खरंच भारतातील आहे का ? वाचा सत्य

सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, पोषक आहार, पुस्तके आणि मोफत गणवेश अशा विविध सवलती उपलब्ध करूनही त्या सर्व घटकांपर्यंत पोहचत नसल्याचा तक्रार नेहमीच केली जाते. याचेच उदाहरण म्हणून शाळेच्या बाकावर फाटक्या कपड्यांमध्ये बसून शिकणाऱ्या एका मुलाचा फोटो शेअर होत आहे. हा फोटो भारतातील सरकारी शाळांची दयनीय स्थिती दर्शवित असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी […]

Continue Reading

महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’मधील गर्दीच्या नावाने ‘मराठा मोर्चा’चा जुना व्हिडिओ व्हायरल

महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.  या मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला यावरून सोशल मीडियावर वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाची ‘नॅनो’ मोर्चा अशी हेटाळणी केली.  फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर […]

Continue Reading

एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर आले म्हणून नरेंद्र मोदींनी त्यांना बाजूला केले का? पाहा या व्हिडिओचे सत्य

पंतप्रधान मोदींनी नुकतेच नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. या सोहळ्यातील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  या व्हायरल क्लिपमध्ये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मागे ढकलताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, एकनाथ शिंदें कॅमेऱ्यासमोर […]

Continue Reading

थायलंडमधील हायवेचा फोटो समृद्धी महामार्गाच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये त्याचे उद्घाटन केले. तत्पूर्वी भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी या लोकार्पण सोहळ्याचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये भाजप नेत्यांसह महामार्गाचा एक विहंगम फोटोसुद्धा वापरण्यात आला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पोस्टर आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून तो फोटो खरंच समृद्धी […]

Continue Reading

आम आदमी पार्टीने ‘गुजरात नमाज पठण करणार’ असे पोस्टर जारी केले नव्हते; वाचा सत्य 

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीने लावलेल्या एका कथित पोस्टरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये लिहिलेले आहे की, भागवत सप्ताह आणि सत्यनारायण कथा सोडून आता गुजरात नमाज पठण करणार. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणी हा दावा खोटा आढळला आहे. व्हायरल होत […]

Continue Reading

व्हायरल होत असलेला गर्दीचा फोटो राजस्थानमधील भारत जोडो यात्रेचा नाही; वाचा सत्य

राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा 4 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये दाखल झाली. तेथील जलवार जिल्ह्यातील चावली येथे मोठ्या प्रमाणात लोक यात्रेत सामील झाले. यानंतर सोशल मीडियावर गर्दीचे काही फोटो व्हायरल होऊ लागले. दावा केला जात आहे की, व्हायरल होत असलेले फोटो भारत जोडो यात्रेला जमलेल्या विराट गर्दीचे आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर […]

Continue Reading

स्वतःच्याच देशाविरोधात वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीला इस्रायलच्या लष्कराने गोळी मारून अपंग केले का?

इस्रायल हा देश कडव्या राष्ट्रप्रेमासाठी प्रसिद्ध आहे. याचे उदाहरण म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका जखमी महिलेचा फोटो शेअर करून म्हटले आहे की, इस्रायलमधील एका अभिनेत्रीने इस्रायलविरोधी वक्तव्य केल्यामुळे तेथील लष्कराने तिला गोळी मारून कायमचे अपंग केले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  आमच्या […]

Continue Reading

नरेंद्र मोदींच्या रॅलीत केजरीवालांचा जयघोष? बनावट व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. सलग 27 वर्षे गुजरातमध्ये सत्ता राखून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः प्रचाराच्या आघाडीवर होते. त्यांनी सुरतमध्ये काढलेल्या भव्य रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या व्हिडिओत त्यांच्यासमोर लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात घोषणा दिल्याचे ऐकू येते. दावा केला जात आहे की, […]

Continue Reading

चीनमधील बुलेट ट्रेनचा फोटो गुजरातचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबर रोजी पार पडले. या निवडणुकीमध्ये ‘गुजरात मॉडेल’ आणि ‘गुजरात विकास’ या दोन गोष्टींची बरीच चर्चा झाली. याचाच भाग म्हणून अनेक डझन बुलेट ट्रेन्स उभ्या असल्याचा एक डोळे दिपवून टाकणारा फोटो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये दाखल झालेल्या बुलेट ट्रेन्सचा हा फोटो आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या […]

Continue Reading

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांचे पोस्टर झळकले का? वाचा सत्य

कतारमध्ये सुरू असलेला फिफा विश्वचषक 2022 फुटबॉलऐवजी इतर गोष्टींसाठीच जास्त चर्चेत आहे. स्टेडियममध्ये कोणत्या वस्तू आणू शकता आणि कोणते कपडे घालू शकता यावरून गोंधळ सुरू आहे. या व्यतिरिक्त फुटबॉल सामन्यांदरम्यान राजकीय विधान करण्याचाही ट्रेंड दिसत आहे.  सोशल मीडियावर सध्या एक फुटबॉल प्रेक्षक भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचे पोस्टर हातात घेऊन उभा असल्याचा फोटो व्हायरल […]

Continue Reading

मतदारांचे पाया पडणारे हे नेते गुजरातचे शिक्षणमंत्री नाहीत; दिल्लीतील जुना फोटो व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तशी प्रचाराची रणधुमाळी जोर पकडत आहे. सर्वच पक्षांचे नेते सभा आणि रॅली काढण्यात व्यस्त असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरोघरी जाऊनही ते प्रचार करीत आहेत.  अशाच एका व्हायरल फोटोमध्ये एक नेता महिलेच्या पाया पडत आहे. हा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, ते गुजरातचे शिक्षणमंत्री जीतू […]

Continue Reading

RBI ला न विचारताच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला, असे रघुराम राजन म्हणाले का? वाचा सत्य

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेशी प्रदीर्घ सल्लामसलत करूनच नोटंबदीचा निर्णय घेण्यात आला होता.  या पार्श्वभूमीवर आरबीआय माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे केंद्राला खोटे ठरवणारे एक कथित विधान व्हायरल होत आहे. यात रघुराम राजन कथितरीत्या म्हणतात की, नोटबंदी जाहीर करण्यात आली तेव्हा मी गव्हर्नर होतो आणि आरबीआयला विचारात न घेताच […]

Continue Reading

इंडोनेशिया जी-20 परिषदेत महिलेने ‘गो बॅक मोदी’चे पोस्टर दाखवले होते का? वाचा सत्य

नुकतेच इंडोनेशियामध्ये झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यात आल्याचा दावा करणारा एक कथित फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक महिला ‘गो बॅक मोदी’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेऊन उभी दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. आमच्या पडताळणीत हा फोटो बनावट आढळला. […]

Continue Reading

ममता बॅनर्जींच्या कोलकाता रॅलीचा जुना फोटो गुजरातमध्ये ‘आप’ची रॅली म्हणून व्हायरल

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 5 डिसेंबर रोजी सुरू होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर होती. आम आदमी पार्टीचे गुजरात राज्यप्रमुख गोपाल इटालिया यांनीसुद्धा सुरत येथून अर्ज दाखल केला. नामांकन भरण्याआधी त्यांनी भव्य प्रचार रॅली काढली होती.  विशाल गर्दीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, इटालिया यांच्या नामांकन रॅलीमध्ये इतक्या […]

Continue Reading

राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेऊन चालले का? वाचा सत्य

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेतील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहेत. अशाच एका व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पकडल्याचे दिसते. सोबत दावा केला जात आहे की, राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये मुंडे यांचा फोटो घेऊन चालले. या फोटोवरून […]

Continue Reading

गुजरातच्या भाजप आमदाराने मोदींवर दंगली करण्याचा आरोप केला का? वाचा या व्हिडिओचे सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, गुजरातमधील भाजप आमदारानेच मोदींवर खोट्या मुस्लिमांकडून दंगली घडवून आणतात असा आरोप केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.   आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला आहे. हा […]

Continue Reading

हे अरुणाचल प्रदेशमधील पंचतारांकित इटानगर विमानतळ नाही; वाचा या व्हिडिओचे सत्य

एका आकर्षक बनावटीच्या इमारतीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर येथे सुरू होणारे नवे विमानतळ आहे. विशेष म्हणजे या विमानतळासाठी पारंपारिक बांबूचा वापर करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

दक्षिण कोरियातील फोटो केजरीवाल यांच्या राजकोट रॅलीतील गर्दी म्हणून व्हायरल; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचारसभांनी जोर धरला आहे. नुकतेच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची राजकोटमध्ये सभा झाली. यानंतर विराट गर्दीचा एक फोटो व्हायरल होऊ लागला असून त्यासोबत दावा केला जात आहे की, तो केजरीवाल यांच्या राजकोट येथील सभेला जमलेल्या गर्दीचा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

Continue Reading

सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून नियुक्तीचा फेक मेसेज पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली, असे मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या जागी आणि सुमित्रा महाजन येणार म्हणून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, ही निव्वळ […]

Continue Reading

ऋषी सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान हवेत असे म्हटलेले नाही; वाचा सत्य

इंग्लंडचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारताविषयी केलेले एक कथित विधान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टला खरे मानले तर सुनक यांनी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असायला हवेत असे म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, सुनक यांच्या नावाने खोटे विधान […]

Continue Reading

केजरीवाल यांच्या रॅलीत मोदींचा मुखवटा घालून प्रचार करणाऱ्या समर्थकाचा व्हिडिओ गुजरातचा नाही; वाचा सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून, सोशल मीडियावर भाजप आणि आम आदमी पार्टी (आप) कार्यकर्त्यांमध्ये चुरस रंगत आहे.  याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, गुजरातमध्ये अरविंद केजारीवाल यांच्या रॅलीत त्यांचे समर्थक नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून प्रचार करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना तुरुंगात टाका असे अरविंद केजरीवाल म्हणाले का?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी गुजरातमधील एका कार्यक्रमात बिलकिस बानो प्रकरणातील गुन्हेगारांविषयीच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळल्यामुळे ‘आप’ पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  यानंतर आता ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये ते आरोपींना तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य करतात. दावा केला जात आहे की, केजरीवाल […]

Continue Reading

‘तोडा आणि राज्य करा’ ही भाजपची परंपरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले का? वाचा सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्याच पक्षावर टीका करताना भाजप ‘तोडा आणि राज्य करा’ हे धोरण घेऊन चालणारा पक्ष असल्याचे म्हटले, असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये काँग्रेसची प्रशंसा करताना ते म्हणतात की ‘जोडा आणि विकास करा’ ही काँग्रेसची परंपरा आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक […]

Continue Reading

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा युवकांना होणारी मारहाण पाहतानाचा व्हिडिओ खोटा; वाचा सत्य

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते कार्यालयात बसून टीव्हीवर बेरोजगार युवकांना पोलिसांनी केलेली मारहाण पाहताना दिसतात. एवढेच नाही तर, हे पाहून ते हसतदेखील आहेत.  हा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, मुख्यमंत्री चव्हाण यांचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा […]

Continue Reading