ऑस्ट्रेलियाच्या अंतराळवीराने अवकाशयानातून पृथ्वीवर उडी मारल्याचा हा व्हिडिओ आहे का?

ऑस्ट्रेलियाच्या एका अंतराळवीराने भीमकाय पराक्रम करीत अवकाशयानातून 1236 किमी उंचीवरून पृथ्वीवर उडी मारली, असा एका व्हिडिओद्वारे दावा केला जात आहे. केवळ 4 मिनिटामध्ये अंतर कापत तो पृथ्वीवर परतला, असेदेखील व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही माहिती दिशाभूल […]

Continue Reading

अमेरिकेने महात्मा बसवेश्वारांचा गौरव करण्यासाठी 100 डॉलरवर त्यांचा फोटो छापला का? वाचा सत्य

अमेरिकेच्या शंभर डॉलरच्या नोटेवर महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा असणाऱ्या एका कथित नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेत अमेरिकेने शंभर डॉलरच्या नोटेवर बसवेश्वरांचा फोटो छापला. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणी अंत कळाले की, हा बनावट फोटो […]

Continue Reading

EXPLAINER – साबरमती नदीमध्ये खरंच कोविड-19 विषाणू सापडला का?

गुजरातमधील साबरमती नदीमध्ये कोरोना विषाणू आढळला, अशा आशयाच्या बातम्यांनी गेल्या आठवड्यात एकच खळबळ उडवून दिली. अहमदाबाद शहरामध्ये तर अफवा पसरली की, पिण्याच्या पाण्यातूनही कोरोना विषाणू पसरत आहे.  आयआयटी गांधीनगर या संस्थेच्या संशोधनाचा हवाला देत या बातम्या देण्यात आल्या आणि त्यावरून सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले. मराठीमध्येदेखील अनेक माध्यामांनी ही बातमी प्रकाशित केली. (लोकसत्ता, लोकमत, सकाळ) […]

Continue Reading

FACT CHECK: 5G मुळे पक्षी मरतात का?

सुपरफास्ट इंटरनेटसेवा प्रदान करणारे ‘5-जी’ तंत्रज्ञान लवकरच येणार आहे. काही देशांमध्ये ‘5-जी’ सेवा सुरू झालेली आहे, तर भारतात चाचणी टप्प्यात आहे. परंतु, लागू होण्यापूर्वीच ‘5-जी’विषयी चुकीची माहिती पसरविली जात आहे. दावा केला जात आहे की, ‘5-जी’ रेडिएशनमुळे पक्ष्यांचे बळी जाणार. ‘5-जी’मुळे पक्षी मरणार, असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी याबाबत आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

FAKE NEWS: देशातील सगळे रस्ते उताराचे बनवणार, असे नितीन गडकरी म्हणाले नाही

इंधन दरवाढीला पर्याय म्हणून देशातील सर्व रस्ते उताराचे बनवणार, अशी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, असा ‘लोकसत्ता’ वेबसाईटच्या बातमीचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटला खरे मानून अनेकजण शेअर करीत आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा […]

Continue Reading

FAKE: सावरकर अंदमान जेलमध्ये असतानाचा ‘हा’ दुर्मिळ व्हिडिओ नाही; वाचा सत्य

विनायक दामोदर सावरकर अंदमान तुरुंगामध्ये काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना चित्रित करण्यात आलेला दुर्मिळ व्हिडिओ म्हणून एक क्लिप व्हायरल होत आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रफितीमध्ये सावरकरांच्या अंदमान जेलमधील परिस्थीतीवर भाष्य करण्यात आलेले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा असत्य […]

Continue Reading

मुंबईत नुकतेच झालेल्या पावसात नवाब मलिक यांच्या घरात पाणी साचले का? वाचा सत्य

यंदा मोसमी पावसाने पहिल्याच दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि लोकल रेल्वेसेवादेखील थांबवावी लागली.  यापार्श्वभूमीवर राज्याचे माहिती कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिका यांच्याच घरात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची […]

Continue Reading

विशाल चंद्राचा हा व्हिडिओ अ‍ॅनिमेशन केलेला; तो खरा नाही, वाचा सत्य

एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला जात आहे की, रशिया आणि कॅनडा दरम्यान एका जागेवर चंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ येतो की, तो जमिनीवर आदळतो की काय असा भास होतो. एवढेच नाही तर तो, चंद्र आकाराने एवढा मोठा दिसतो की, काही सेकंदांसाठी संपूर्ण सूर्य झाकोळून टाकतो. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) […]

Continue Reading

FAKE NEWS: रशियाने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटलेले नाही

कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे.  रशियाने जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला […]

Continue Reading

‘पतंजली’चे बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्समध्ये भरती करण्यात आले का? वाचा सत्य

कोरोनावरील प्रभावी उपचारावरून ‘आयुर्वेद वि. अ‍ॅलोपथी’ असे रामदेव बाबा आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांचे सहकारी व ‘पतंजली’ ग्रुपचे चेअरमन बालकृष्ण दवाखान्यात उपचार घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  सोबत दावा केला जात आहे की, बालकृष्ण यांना कोरोना झाल्यामुळे एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

‘कोविड’ मुळे मृत्यू झाल्यावर कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत मिळणार का? वाचा सत्य

कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे निधन पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना शासनाकडून 4 लाख रुपयांचा मदतनिधी देणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करायचा अर्जदेखील व्हायरल मेसेजमध्ये शेअर केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व अर्ज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा दावा दिशाभूल […]

Continue Reading

बिहारमधील ही नवरी 8 वर्षांची अल्पवयीन नाही; तिचे वय 19 वर्षे आहे, वाचा सत्य

सोशल मीडियावर एका नवरी मुलीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, बिहारच्या नवादा येथे एका 8 वर्षांच्या मुलीचे 28 वर्षीय मुलाशी लग्न लावण्यात आले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. हा दावा खोटा आहे. व्हायरल फोटोतील मुलगी अल्पवयीन नाही. तिचे वय सध्या 19 […]

Continue Reading

गोमुत्राच्या अतिसेवनामुळे प्रज्ञा ठाकूर यांना दवाखान्यात न्यावे लागले का? वाचा सत्य

दररोज गोमुत्र पिल्यामुळे मला कोरोना झाला नाही, असे विवादस्पद विधान करणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. स्ट्रेचर झोपलेल्या प्रज्ञा ठाकूर यांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात भरती करतानाचा हा फोटो आहे. दावा केला जात आहे की, गोमुत्राचे अतिसेवन केल्यामुळे त्यांना मुंबईच्या दवाखान्यात भरती करावे लागले. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप […]

Continue Reading

भाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही; वाचा सत्य

देशातील कोरोना संकटाला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले, अशी टीका करणाऱ्या एका महिलीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला भाजप खासदार मनेका गांधी आहेत.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, ही महिला […]

Continue Reading