सध्या व्हायरल होत असलेला तो फोटो हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचा नाही; वाचा सत्य

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीचा सामूहिक बलात्कारनंतर मृत्यू झाला. या पीडित मुलीचा फोटो म्हणून एक छायाचित्र शेयर केले जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी हाथरस प्रकरणातील पीडिताला न्याय देण्याची मागणी करीत हा व्हायरल फोटो पोस्ट केला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत व्हायरल होत असलेला फोटो त्या पीडितेचा नाही, हे समोर आले. काय आहे दावा? मूळ पोस्ट येथे […]

Continue Reading

गुन्हेगार नेत्यांची पोलखोल करणारा हा व्हिडियो IPS शैलजाकांत मिश्रा यांचा नाही; वाचा सत्य

भारतामध्ये गुन्हागार नेते निवडणूक कशी जिंकतात हे उलगडून सांगणारा एक व्हिडिओ सध्या बराच गाजत आहे. राजकारणातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी शैलजाकांत मिश्रा यांचा असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडियो खरं तर नितीश राजपूत नावाच्या आयटी प्रोफेशनल तरुणाचा आहे. काय आहे व्हिडियोमध्ये? सात […]

Continue Reading

हरियाणामध्ये शेतकऱ्यांनी भाजप खासदाराला काळे फासले का? वाचा व्हिडियोमागचे सत्य

नव्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यांवर उतरले असून, काही ठिकाणाला आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडियोद्वारे दावा केला जात आहे की, संतप्त शेतकऱ्यांनी भाजप खासदार राजकुमार सैनी यांच्या तोंडाला काळे फासले. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्या आढळला. हा व्हिडियो चार वर्षांपूर्वीचा म्हणजे 2016 मधील आहे. काय आहे व्हिडियोमध्ये? सोशल मीडियावरील व्हायरल क्लिपमध्ये […]

Continue Reading

ग्रीसमधील क्रूझ जहाज भरूच-भावनगरमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

भावनगर ते भरुच रोड हे 350 किलोमीटर अंतर आहे. समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे. आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे. एकाच वेळी 600 लोक आणि अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करणार आहेत. जहाजाची क्षमता 50 ट्रक, 60 बसेस, 200 कार, 350 मोटारसायकली आहे. या माहितीसह सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल […]

Continue Reading

सरडा रंग बदलत असतानाची ही द्दश्ये कर्नाटकातील व्हिडिओग्राफरने टिपलेली नाहीत; वाचा सत्य

सरडा रंग बदलत असतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील द्दश्ये कर्नाटकातील बंगळुरू येथील व्हिडिओग्राफर विक्रम पोनप्पा यांनी टिपली असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही द्दश्ये विक्रम पोनप्पा यांनी टिपली आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी या व्हिडिओविषयी जाणून घेण्यासाठी विक्रम पोनप्पा यांच्या […]

Continue Reading

2017 मधील मोर्चाचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून व्हायरल

केंद्राच्या पावसाळी आधिवेशनात तीन कृषी विषयक विधेयक मंजूर करण्यात आल्यापासून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये याविरोधात शेतकरी आंदोलने करीत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विराट गर्दीचा एक फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, हा फोटो कृषी विधेयकाविरोधातील आंदोलनाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दवा असत्य ठरला. हा फोटो तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली […]

Continue Reading

सुधा मुर्ती वर्षातून एकदा भाजी विकतात का? वाचा सत्य

भाजीपाला विक्री करणे तरुण तरुणींना कमीपणाचे वाटते. इन्फोसिसच्या सह-संस्थापिका आणि नावाजलेल्या लेखिका सुधा मूर्ती दरवर्षी एक दिवस भाजी विकायला बसतात केवळ अहंकार दूर ठेवण्यासाठी, अशा माहितीसह समाजमाध्यमात सुधा मुर्ती यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. सुधा मुर्ती या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी   सुधा मुर्ती वर्षातून एकदा […]

Continue Reading

राजकीय पोस्ट न करण्याबाबत सरकारने नवीन सोशल मीडिया नियम लागू केले आहेत का?

सोशल मीडियावर काही अफवा असतात ज्या ठराविक काळाच्या अंतराने पुन्हा परत येतात. अशीच एक अफवा म्हणजे सरकारने सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे आणि काय नाही याबाबत नवे नियम लागू केल्याचा मेसेज.  या फेक मेसेजमध्ये म्हटले जाते की, सरकारने नवीन संप्रेषण नियम लागू केले असून, त्याअंतर्गत सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील, सगळे मोबाईल मंत्रालयाशी जोडले जातील, […]

Continue Reading

देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा लॉकडाऊनचा संदेश खोटा; वाचा सत्य

देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा 46 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा संदेश सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या संदेशाची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी देशात 25 सप्टेंबर 2020 पासून पुन्हा 46 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणार असल्याचा संदेश खरा आहे का, याचा शोध घेतला त्यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे […]

Continue Reading

FACT CHECK – चार्जिंगला लावून मोबाईलवर बोलल्यामुळे या मुलाचा मृत्यू झाला का?

शरीरापासून डोकं वेगळं झालेल्या मुलाचा रक्तबंबाळ फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य सिद्ध झाला. पाकिस्तानात काकांनी पुतण्याची केलेल्या हत्येचा हा फोटो आहे. काय आहे दावा? बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात धडापासून शीर वेगळे झालेल्या मुलाचा फोटो शेयर करून म्हटले की, “चार्जिंगला मोबाईल […]

Continue Reading

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी IDBI बँकेच्या व्यवस्थापकास मारल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बँक व्यवस्थापकास मारहाण करणारे हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  मुंबईत आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा या व्हिडिओचा शोध घेतला. त्यावेळी 13 सप्टेंबर 2020 रोजी […]

Continue Reading

FACT CHECK: अमिताभ बच्चन यांनी कोरोनामुक्त झाल्यावर हाजी अलीला भेट दिली का?

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना जुलै महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काही आठवड्यांच्या उपचारांनंतर दोघांनी कोरोनावर मात केली. सोशल मीडियावर आता दावा केला जात आहे की, कोरोनातून ठीक झाल्यानंतर अमिताभ बच्चन सर्वप्रथम मुंबईतील हाजी अली दर्गा येथे भेट देऊन चादर चढविली. बच्चन यांच्या फोटोला धार्मिक रंग देऊन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोवर बहिष्कार टाकण्याचे […]

Continue Reading

गुजरातमधील मगरीचा व्हिडिओ पाकिस्तानचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

रहिवाशी भागात चक्क मगर आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. घरासमोरील रोडवर मगर पाहून तेथील रहिवाशांची चांगलीच भांबेरी उडाल्याचे या व्हिडिओत दिसते. दावा केला जात आहे की, ही घटना पाकिस्तानातील कराची शहरातील आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला. हा व्हिडिओ पाकिस्तानातील नसून, गेल्या वर्षी गुजरातच्या वडोदरा शहरात आलेल्या मगरीचा आहे. काय आहे […]

Continue Reading

कोलंबियातील बसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असल्याचे खोटे; वाचा सत्य

कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. समाजमाध्यमात व्हायरल होणारे हे छायाचित्र खरे आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  कोलंबिया (अमेरिका) येथे तेथील रस्त्यावर धावणाऱ्या शहर बससेवेचे हे  छायाचित्र खरे आहे का, हे जाणून घेण्यासाठी […]

Continue Reading

दक्षिण आफ्रिकेतील बिबट्याचा व्हिडिओ राजस्थानमधील म्हणून व्हायरल; वाचा सत्य

राजस्थानमधील रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी राजस्थानमधील रणथंबोर येथील हॉटेल ताजमधील बिबट्याचा हा व्हिडिओ आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी travelandleisure.com या संकेतस्थळावर 9 सप्टेंबर […]

Continue Reading

या फोटोत कंगनासोबत अबू सालेम किंवा त्याचा भाऊ नाही; वाचा सत्य

कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या भावासोबत अभिनेत्री कंगनाचा फोटो अशा दाव्यासह एक छायाचित्र व्हायरल होत आहे. काहींनी तर ही व्यक्ती खुद्द अबू सालेमच आहे, असेही म्हटले आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे दोन्ही दावे खोटे सिद्ध झाले. काय आहे दावा? कंगना आणि एका व्यक्तीचा फोटो शेयर करून कॅप्शन दिली आहे की, “लाडकी कंगना राणावत लढाईसाठी जाण्याअगोदर एनर्जी […]

Continue Reading

कंगनाने 2017 साली नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह ट्विट केले होते का? वाचा सत्य

गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत आहे. शिवसेनेवर निशाणा साधत तिने देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळाची स्तुती करणारे ट्विटही केले. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कंगनाने 2017 साली नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करणारे ट्विट केले होते.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे ट्विट कंगनाने केले नव्हते असे समोर आले. काय […]

Continue Reading

कंगना रणौतने झाशीच्या राणीचा अपमान केला का? वाचा त्या व्हिडिओमागील सत्य

सध्या वादग्रस्त ठरत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा अपमान केला, अशा दाव्यासह एक क्लिप फिरत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना “झांसी की रानी क्या मेरी चाची हैं” असे म्हणते. यावरून तिने राणी लक्ष्मीबाई यांची खिल्ली उडवली, असा प्रचार केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने तपासणी केली असता व्हायरल होत असलेली क्लिप एटिड करून संदर्भाशिवाय […]

Continue Reading

बेरोजगार युवकांनी योगी आदित्यनाथ यांचा ताफा रोखल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट पसरलेले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस उत्पादन बंद राहिले. त्यामुळे बेरोजगारीचा दर दिवसेंदिवस वाढत असून, युवकांना नोकरीची चिंता भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर एका व्हिडिओ पसरवून दावा केला जात आहे की, संतापलेल्या बेरोजगार युवकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ताफा अडवून निषेध केला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ 2017 सालचा असल्याचे समोर […]

Continue Reading

कोरोनाच्या नावाखाली किडनी तस्करी केली जात आहे का? वाचा त्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

कोरोनाच्या नावाखाली दवाखान्यांमध्ये अवयव चोरीचा गोरखधंदा सुरू असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याला पुरावा म्हणून मृत रुग्णाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी किडनी काढल्याचे आरोप करतानाचा एक व्हिडिओ सध्या फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ जुना आणि त्याद्वारे केला जाणारा आरोप खोटा असल्याचे समोर आले. काय आहे व्हिडिओमध्ये? सुमारे तीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मृत रुग्णाचे […]

Continue Reading

उबर-ओलाला पर्याय म्हणून टाटा ग्रुपने Cab-E टॅक्सी सेवा सुरू केल्याची अफवा व्हायरल

उबर आणि ओला यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी टाटा ग्रुपतर्फे ‘कॅब-ई’ (Cab-E) नावाची नवी ऑनलाईन टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली, असा सोशल मीडियावर दावा केला जात आहे. सध्या मुंबई आणि पुण्यात उपलब्ध या सेवेला टाटा ग्रुपच्या नावाने साथ देण्याचे भावनिक आवाहन करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले. काय आहे दावा? […]

Continue Reading

‘संजय राऊत’ यांचा डान्स करतानाचा तो फेक व्हिडिओ पुन्हा व्हायरल

कंगना रणौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचा वाद विकोपाला जात असताना सोशल मीडियावर निरनिराळे दावे केले जात आहे. त्यातच आता संजय राऊत यांचा डान्स करतानाचा म्हणून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.   फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा व्हिडिओ संजय राऊत यांचा नसल्याचे समोर आले. या व्हिडिओत दिसणारी व्यक्ती परभणीमधील एक पोलिस कर्मचारी आहे. काय आहे दावा? […]

Continue Reading

कंगना रणौतच्या समर्थनात करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा रवाना झाला का? वाचा सत्य

अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे वाकयुद्ध तापलेले आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कंगनाला समर्थन देण्यासाठी करणी सेनेचा 1000 वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा (FALSE) आढळला. काय आहे दावा? सोशल मीडियावरील पोस्टमध्ये वाहनांच्या लांबच्या लांब ताफ्याचे फोटो शेयर करून कॅप्शन दिली आहे […]

Continue Reading

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा हा व्हिडिओ आहे का? वाचा सत्य

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांनी कोरोना विषाणूची लागण होऊ नये, म्हणून सांगितलेला व्यायाम अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कोणाचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांचा म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुणाचा आहे, याची माहिती […]

Continue Reading

हरियाणात अलिकडे झालेल्या आंदोलनाच्या नावे तीन वर्षांपूर्वीचे फोटो व्हायरल; वाचा सत्य

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांविरोधात हरियाणातील शेतकऱ्यांनी कुरूक्षेत्रजवळ पिपली येथे 10 सप्टेंबर 2020 रोजी आंदोलन केले. या आंदोलनाची विविध छायाचित्रे सध्या समाजमाध्यमात पसरत आहेत.  यातील एका छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता कळाले, ते तीन वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनाचे आहे. काय आहे दावा? फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  पोस्टमधील दोन्ही छायाचित्रांनी गुगल […]

Continue Reading

महाराष्ट्रात ‘एलियन प्राणी’ आल्याची अफवा व्हायरल; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कोरोनामुळे जग आधीच हैराण असताना वरच्यावर नवनवीन अचंबित करणाऱ्या घटना समोर येत आहेत. आता अशा वावड्या उठल्या की, गुजरातहून महाराष्ट्रात एक विचित्र दिसणारा प्राणी आला आहे. परग्रही जीव भासावा अशा या प्राण्याने अनेकांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या कथित प्राण्याचे फोटो शेयर करून शेतकऱ्यांना एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये […]

Continue Reading

रशियातील पॅराशूटचा व्हिडिओ पाकिस्तानचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

पॅराशुटद्वारे जमिनीवर उतरताना एका पॅराट्रुपरची भांबेरी उडाल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडियो पाकिस्तानी सैनिकाचा असल्याचा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हा व्हिडियो सुमारे आठ वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असून, तो रशियाचा आहे. काय आहे दावा? फेसबुक पोस्ट / संग्रहित  तथ्य पडताळणी सर्वप्रथम व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज […]

Continue Reading

मध्यप्रदेशमधील रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात लासलगावच्या नावाने व्हायरल; वाचा सत्य

रेल्वे क्रॉसिंगवरील एका भीषण अपघाताचे दोन सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नियंत्रण सुटल्यामुळे एक भरधाव ट्रकने रेल्वे फाटकाजवळ उभ्या एका जीपला जोरदार धडक मारली आणि त्यात एक महिलादेखील चिरडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. दावा केला जात आहे की, हा अपघात लासलगाव (जि. नाशिक) येथे झाला. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला. हे व्हिडिओ मध्य […]

Continue Reading

या फोटोतील तीन IPS अधिकारी एकाच घरातील भाऊ-बहिण नाहीत; वाचा सत्य

तीन तरुण आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दोन पुरुष व एका महिला अधिकाऱ्याच्या या फोटोवरून दावा केला जात आहे की, एकाच कुटुंबातील हे तिघे भावंड आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, हे तिघे एकमेकांचे भाऊ-बहिण नाहीत. काय आहे दावा? मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह […]

Continue Reading

‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडीच्या व्हिडिओचे सत्य काय?

डब्यावर ‘अदानी’ लिहिलेल्या रेल्वे मालगाडी व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेचे नाव बदलून मालगाडीवर ‘अदानी’ असे लिहिण्यात आले आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  भारतीय रेल्वेचे खासगीकरण करून मालगाड्या चालविण्यात येत असल्याच्या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी शोध घेतला. […]

Continue Reading

काय आहे केवळ एका महिन्यासाठी प्रकट होणाऱ्या चमत्कारीक नदीच्या व्हिडिओचे सत्य?

नदीपात्रामध्ये पाणी वाहतानाचा व्हिडिओ शेयर करून दावा केला जात आहे की, दक्षिण भारतातील ही एक चमात्कारिक नदी. केवळ पितृपक्षाच्या अमावस्येला ही नदी प्रकट होते आणि दीपावलीच्या अमावस्येला विलीन होते. केवळ एक महिनाच प्रवाहित राहणाऱ्या या कथित नदीविषयी सोशल मीडियावर कुतूहल आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडिओची पडताळणी केली असता, हे दावे खोटे असल्याचे समोर आले. वाचा […]

Continue Reading

कोथिंबिरीतून 12.5 लाखांचे उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्याचा हा फोटो नाही. वाचा सत्य

केवळ चार एकरामध्ये कोथिंबिरीसारख्या पिकातून साडेबारा लाखांचे उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामधील नांदूरशिंगोटे गावातील विनायक हेमाडे या शेतकऱ्याची ही यशोगाथा शेयर करताना अनेकांनी डोक्यावर नोटांचे गाठोडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो शेयर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता कळाले की, […]

Continue Reading

लिंबाच्या रसाने कोरोना विषाणू नष्ट होत नाही; वाचा सत्य

फक्त एक रूपयात घरगुती पद्धतीने कोरोना विषाणू नष्ट होतो, असा दावा करणारा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. आंध्र प्रदेशमधील रंगा व्यंकटेश्वर राव यांच्या नावाने हा संदेश व्हायरल होत असून त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याचा दावाही करण्यात येत आहे.  या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? […]

Continue Reading

राजस्थानमधील जुना व्हिडिओ कोरोनाग्रस्ताची किडनी काढण्यात आल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

कोरोना विषाणूची लागण झालेल्या एका रूग्णाची किडनी डॉक्टरांनी काढून घेतल्याचा म्हणून समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णाची किडनी काढल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.  फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी   कोरोनाग्रस्त व्यक्तीची किडनी काढून घेतल्याचा हा व्हिडिओ आहे का, यासाठी शोध घेतला त्यावेळी […]

Continue Reading

तैवानने चीनचे विमान पाडले का? वाचा तैवान सरकारने केलेला खुलासा…

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, चीनच्या सैन्यविमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे तैवानने चीनचे विमान पाडले. इतरांनी यापुढे जात म्हटले की, या घटनेत चीनेच्या एसयू-35 विमान क्षतिग्रस्त झाले असून, एक पायलट जखमी झाला असून, तैवानच्या सैनिकांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीमध्ये तैवान सरकारने असे काही झाले नाही असा खुलासा केल्याचे […]

Continue Reading

स्वित्झर्लंडमधील फुटबॉल प्रेक्षकांच्या भांडणाचा व्हिडिओ स्वीडनमधील दंगलीचा म्हणून व्हायरल

स्वीडनच्या माल्मो शहरात गेल्या आठवड्यात दंगल उसळली होती. या दंगलीविषयी भारतीय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर एक जमाव दगड-काठ्यांनी हल्ला करीत असल्याचा एक व्हिडिओ पसरवून दावा केला जात आहे की, तो स्वीडनमधील दंगलीचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याबाबत पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडिओ 2018 साली स्वित्झर्लंडमध्ये फुटबॉल मॅचनंतर चाहत्यांमध्ये […]

Continue Reading

हुबळीतील मॉक ड्रीलचा व्हिडिओ दहशतवादी पकडल्याचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

हुबळी येथे दहशतवादी पकडण्यात आल्याचा म्हणून समाजमाध्यमात एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती डोक्याच्या मागे हात ठेवून गुडघ्यावर बसलेली दिसते. या व्यक्तीला पोलिसांनी वेढले असल्याचे दिसून येते. हुबळी येथे खरोखरच असा दहशतवादी पकडण्यात आल्याचा हा व्हिडिओ आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी  हुबळी […]

Continue Reading

‘स्टीम ड्राईव्ह’मुळे कोरोना नष्ट होत असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

गरम वाफेद्वारे कोविड-19 विषाणू नाक-तोंडामध्ये मारता येऊ शकतो, असा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्याआधारे कोरोना समूळ नष्ट करण्यासाठी ‘स्टीम ड्राइव्ह’ अशी मोहिम सुरू करण्याचीही मागणी केली जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली असता, ही माहिती असत्य असल्याचे समोर आले. काय आहे पोस्टमध्ये? फेसबुक पोस्ट ।  संग्रहित तथ्य पडताळणी  आठवडाभर गरम वाफ […]

Continue Reading

स्वीडनमध्ये मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ जाळल्यामुळे दंगल पेटल्याचा दावा खोटा; वाचा सत्य

स्वीडनच्या माल्मो शहराती गेल्या शुक्रवारी (28 ऑगस्ट) भीषण दंगल उसळली होती. या हिंसाचारावरून सोशल मीडियावर विविध दावे करून सांप्रदायिक अपप्रचार केला जात आहे. मुस्लिमांनी आधी ‘बायबल’ ग्रंथ जाळला व त्याला प्रत्युत्तर म्हणून ख्रिश्चन समाजातील काही लोक ‘कुराण’ जाळण्याच्या तयार असताना मुस्लिमांनी स्वीडनमधील शहर पेटवून दिले, असा मेसेज सध्या फिरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने मेसेजची पडताळणी केली […]

Continue Reading

डॉक्टरांवर आरोप करणाऱ्या पित्याचा तो व्हिडिओ नागपुरचा नसून भोपाळचा आहे

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या एका पित्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉक्टरांनी एका मुलीला बळजबरीने कोविड-19 घोषित करून दुसऱ्या मुलीकडे दुर्लक्ष केले व तिचा मृत्यू झाला, असा आरोप पित्याने केला आहे. ही घटना नागपुरमधील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने व्हिडिओची पडताळणी केली असता कळाले की, हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील […]

Continue Reading

रेल्वे खासगीकरणाविरोधात गेल्या वर्षी केलेल्या आंदोलनाचा व्हिडिओ आताचा म्हणून व्हायरल

रेल्वेच्या खासगीकरणाविरोधात गेल्या सात दिवसांपासून देशभरात आंदोलने सुरू आहेत; परंतु, न्यूज चॅनेल्स त्याची बातमी दाखवत नसल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका मोर्चाचा व्हिडिओ शेयर केला जात आहे. रेल्वे खासगीकरणाविरोधात पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या आंदोलनाचा तो व्हिडिओ आहे, असा दावा केला जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता, […]

Continue Reading

सगळ्यांनी मास्क घालणे गरजेचे नसल्याचे सांगणारा हा व्हिडिओ जुना; वाचा सत्य

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतात सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. समाजमाध्यमात मात्र सध्या एक व्हिडिओ क्लीप व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरूणी बसथांब्यावर मास्क न घालता बसलेली दिसत आहे. तिथे मास्क घालून बसलेली एक व्यक्ती युवतीला मास्क न घातल्याबद्दल विचारते. त्यावेळी युवती कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी निरोगी व्यक्तीने […]

Continue Reading